तुकाराम मुंढे कारवाईसाठी रस्त्यावर जेव्हा उतरतात....

राज्याच्या उपराजधानीत कोरोना संसर्ग वेगानं वाढत असताना आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच आज कारवाईसाठी रस्त्यावर उतरले 

Updated: Jul 21, 2020, 08:52 AM IST
तुकाराम मुंढे कारवाईसाठी रस्त्यावर जेव्हा उतरतात.... title=

नागपूर : राज्याच्या उपराजधानीत कोरोना संसर्ग वेगानं वाढत असताना आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच आज कारवाईसाठी रस्त्यावर उतरले .मुंढेंनी आज बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. बर्डी , कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा, गांधीसागरदरम्यान कोविडबाबतच्या नियमांचं उल्लंघन करणा-या दुकांनदारांवर आणि लोकांवर कारवाई केली. 

झांशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये  नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली.  

ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली.

यानंतर बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधी सागरदरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

नियमांचं उल्लंघन होत असल्याचं पाहिल्यानंतर  मुंढेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही असा होत नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम पाळा. 

अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा अगोदरच  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला होता. त्यानंतर आज सायंकाळी ते रस्त्यावर उतरले. 

शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये स्वत: जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या  दुकानदारांवर कारवाई करण्याचे  त्यांनी निर्देश दिलेत.