कोल्हापूर : खळबळजक बातमी मलकापूरमधून. मलकापूरमध्ये दोन मृत अर्भकं, चार गर्भाशयं आणि औषधांच्या पेट्या सापडल्या आहेत. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबधातून हे कृत्य झाल्याची चर्चा आहे.
नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना भाजी मंडईच्या इमारतीजवळ कचराकुंडीत ही अर्भकं सापडली. एक पुरुष आणि एक स्त्री जातीचं हे अर्भक आहे. याबाबत शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.