बंडखोरांना तोतये, आता दिल्लीतील कानांचे पडदे फाटले पाहिजेत, ठाकरेंची तोफ धडाडली

बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, उद्धव ठाकरे

Updated: Dec 17, 2022, 02:51 PM IST
 बंडखोरांना तोतये, आता दिल्लीतील कानांचे पडदे फाटले पाहिजेत, ठाकरेंची तोफ धडाडली  title=

Uddhav Tahckeray Maha Morcha : मविआच्या हल्लाबोल मोर्चामध्ये संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी बंडखोरी केलेल्या आमदारांसह दिल्लीवरही निशाणा साधला. संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षानंतर असं दृश देशानेच नाहीतर जगाने कधी पाहिलं नसेल. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पण बेळगाव निपाणी संयुक्त महाराष्ट्र झाला नसल्याचं सांगत बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. 

Maha Vikas Aghadi Morcha Updates : महाविकास आघाडीचा मोर्चा कशासाठी?

एवढी ताकद एकवटल्यानंतर काय हिम्मत आहे कोणाची मुंबई किंवा महाराष्ट्राचा लचका कोण काढतं आम्ही बघतो. आजच्या मोर्चाने दिल्लीचे कानांचे पडदे फाटले पाहिजेत. एका बाजूने आपले आदर्श पायदळी तुडवायचे त्यांचा अपमान करायचा. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असणारे उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळवून न्यायचे. महाराष्ट्र कसा भिकेला लागेल असा यांचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्रद्रोह्यांचा राजकारणात शेवट केल्याशिवाय आता स्वस्थ बसता येणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मी राज्यपालच मानत नाही. त्यांच्या खुर्चीचा मी मान ठेवतो, पण महापुरूषांबाबत ते अवमानकारक वक्तव्य करत आहेत. स्वत:ला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारे तोतये समजतात. पण, त्यांचे विचार दिल्लीशी लाचारी करणारे नव्हते. खुर्ची गेली तर बेहत्तर पण महाराष्ट्राच्या स्वाभिमान आणि अस्मितेशी तडजोड करणार नसल्याचं सांगत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला.