देशातील 13 विमानतळांचं नाव बदलणार, केंद्रीय मंत्र्यांचे संकेत

औरंगाबाद, शिर्डी आणि कोल्हापूर विमानतळ आता या नावाने ओळखली जाणार

Updated: Feb 18, 2022, 08:21 PM IST
देशातील 13 विमानतळांचं नाव बदलणार, केंद्रीय मंत्र्यांचे संकेत title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या राज्यातील तीन विमानतळांचं नामकरण करण्याच्या हालचालींना वेग आलं असून, लवकरच या विमानतळाचं नामकरण होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रीराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. तसंच देशातील एकूण १३विमानतळाच नामकरण होणार असल्याचं सुद्धा कराड म्हणाले.

औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी आले असता कराड माध्यमांशी बोलत होते. राज्यातल्या औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज, शिर्डीच्या विमानतळाला साईबाबा आणि कोल्हापूरच्या विमानतळाचे महालक्ष्मी विमानतळ असं नामकरण लवकरच केली जाणार असल्याचं भागवत कराड म्हणाले.

तसच औरंगाबाद, शिर्डी, कोल्हापूरसह देशातील 13 विमानतळांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचं भागवत कराड यांनी सांगितलं. 

तर औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्याच्या मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसून, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच एकत्रित प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवतील असंही कराड म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x