प्रेमविवाह न करण्याची शपथ : शिक्षकांचं निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थीनींचं आंदोलन

व्हॅलेंन्टाईन डे'ला कॉलेज विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. 

Updated: Feb 27, 2020, 09:15 PM IST
 प्रेमविवाह न करण्याची शपथ : शिक्षकांचं निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थीनींचं आंदोलन title=

अमरावती : 'व्हॅलेंन्टाईन डे'ला कॉलेज विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. त्याप्रकरणी आता प्राचार्यांसह तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांचं निलंबन मागे घ्यावं, या मागणीसाठी कॉलेज विद्यार्थिनींनी आंदोलन सुरू केलं आहे. 

चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्राध्यापकांनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ दिली होती. त्यावरून राज्यभरात खळबळ उडाली होती. 

याप्रकरणी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीनं चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीच्या अहवालानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी कापसे या तिघांना निलंबित करण्यात आलं. 

दरम्यान, या निलंबनाच्या विरोधात विद्यार्थिनींनी कॉलेजला कुलूप लावून आंदोलन केलं. तीन प्राध्यापकांचं निलंबन मागे घेत नाही, तोपर्यंत कॉलेजवर बहिष्कार घालण्याची भूमिका विद्यार्थिनींनी घेतली आहे.