मोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

रस्ता ओलांडून शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थीनीला  मोटारसायकलने जोरात धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 2, 2018, 08:58 PM IST
मोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

वसई : रस्ता ओलांडून शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थीनीला  मोटारसायकलने जोरात धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वसईतील ही घटना ७ दिवसांनी समोर आली आहे.

मुलगी गंभीर जखमी

 या दुर्घटनेत शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली.  वसईच्या 'निर्मला माता स्कूल'चीं ही विद्यार्थीनी आहें. 

शाळेतून घरी जात असताना भरधाव वेगाच्या पल्सर गाडीने तिला उडविले. गाडीवर दोघेजण असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. 

चालकाला चोप 

 नागरिकांनी जखमी मुलीला तात्काळ रस्त्याच्या बाजूला करून तिला जवळच्याच रुग्णालयात दाखल केले.

तर मोटारसायकल चालकाला पकडून चोपही दिला आहे. 

भरधाव वेग 

२५ जानेवारी रोजी साडे चार वाजता वसईच्या माणिकपूर नाक्यावर ही घटना घडली आहे.

अपघाताचा सर्व प्रकार रस्त्या लगतच्या एका सीसीटीव्ही त कैद झाला आहे. सीसींटीव्ही च्या दृश्यावरुन या गाडीच्या वेगाचा अंदाज येतो.