विधानसभेत भाजप आणि शिवसेना आमदार एकमेकांच्या अंगावर धावले

भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर घेऊन आले.

Updated: Dec 17, 2019, 12:18 PM IST
विधानसभेत भाजप आणि शिवसेना आमदार एकमेकांच्या अंगावर धावले title=

मुंबई : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील गोंधळाने झाली आहे. विधानसभेत भाजपा आमदार अभिमन्यू पवार आ़णि शिवसेना संजय गायकवाड एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा भाजपच्या आमदारांनी 'सामना'तील बॅनर झळकावले. मुख्यमंत्र्यांसोर हे बॅनर नेण्याचा प्रयत्न भाजपा आमदारांनी केला.

भाजपा आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बॅनर घेऊन आले. तेव्हा शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि हरिश पिंपळे यांच्यात वाद झाला. यावेळी दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले. भाजपा आमदार घोषणाबाजी करत व्हेलमध्ये आले, त्यांच्या हातात बॅनर होते. काही आमदारांनी हे बॅनर उद्धव ठाकरे यांच्यासमोर झळकवले. तेव्हा शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बॅनर हुसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भाजपाचे हरिश पिंपळे आणि नितीन देशमुख यांच्यात धक्काबुक्की झाली.

महाराष्ट्राच्या विधानसभेत आरोप-प्रत्यारोप झाले पण समोरासमोर येऊन अंगावर धावून जाण्याचे प्रकार क्वचितच दिसतात. त्यामुळे विधानसभेचे पावित्र्य जपण्यासाठी अध्यक्ष कडक पाऊले उचलावे लागणार आहेत. इथे देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा देण्यापेक्षा केंद्रातून मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा. राज्यातील शेतकर्‍याची चिंता सत्तेवर असताना केलं नाही, आता पुळका आलाय, पण तो नाटकी आहे हे जनतेला माहित असल्याचे पाटील म्हणाले.

विधानसभेच्या पहिल्या दिवसापासूनच भाजप आक्रमक पावित्र्यात आहे. सावरकरांच्या मुद्द्यावर भाजप आमदारांनी पहिल्या दिवशी बॅनरबाजी केली तसेची मी सावरकच्या टोप्या घालून ते विधानसभेत गेले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्ताव मांडत या मुद्द्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्ये कामकाजातून काढून टाकली. 

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.