अण्णा नाईक-शेवंताचे फोटो दाखवत होमगार्डकडून महिलेचा विनयभंग

'रात्रीस खेळ चाले' मालिकेची अण्णा नाईक आणि शेवंता जोडी सध्या चांगलीच गाजत आहे.

Updated: Jan 27, 2020, 08:40 PM IST
अण्णा नाईक-शेवंताचे फोटो दाखवत होमगार्डकडून महिलेचा विनयभंग  title=

पुणे : 'रात्रीस खेळ चाले' मालिकेची अण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी सध्या चांगलीच गाजत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु पुण्यात त्यांच्या फोटोंचा गैरवापर झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील होमगार्डने अण्णा-शेवंताचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवून एका  महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. 

होमगार्ड पुणे शहर समुपदेशक उत्तम शिवाजी साळवी याला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. २८ वर्षीय होमगार्ड महिलेने साळवीविरोधात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

मार्च २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधील आरोपी महिलेले वारंवार मेसेस पाठवत असे. माझ्यासोबत फिरायला चल. मी जसं सांगेल तसं वागली नाहीस तर नोकरीवरून काढून टाकेल अशी धमकीही देत असल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला होमगार्ड फुलेनगर येथील कार्यालयाअंतर्गत कार्यरत होती.

त्याचप्रमाणे साळवीने महिलेच्या फोनवर अण्णा नाईक  आणि शेवंताचे काही आक्षेपार्ह फोटो पाठवले होते. शिवाय 'प्रेमाला वय नसतं' अशा आशयाचा मेसेज देखील केल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणावरून कामाच्या ठिकाणी देखील महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे. 

अखेर त्रासाला कंटाळत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x