महिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ

अनेकदा लोक भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून बाजारात सूट मागतात, किंवा पैसे कमी करताना तुम्ही लोकांना पाहिलेच असेल. 

Updated: Aug 2, 2021, 07:58 PM IST
महिलांनाही Bargainingमध्ये मागे टाकेल अशी तरुणाची ट्रीक, पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर रोज आपल्याला काही ना काही वेगळं पाहायला मिळत असतं, त्यात काही लोकं असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात जे खरोखरच खुप मनोरंजन करणारे असतात. तर काही व्हिडीओ आपल्याला माहिती देतात. हे कंटेनंट टाकणारे लोकं स्वत:चे फॉलेअर्स वाढवण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शेअर करत असतात, तर काही लोक अशाप्रकारचे व्हिडीओ स्वत: बनवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही.

अनेकदा लोक भाजी आणि फळ विक्रेत्यांकडून बाजारात सूट मागतात, किंवा पैसे कमी करताना तुम्ही लोकांना पाहिलेच असेल. त्याशिवाय तुम्ही देखील बाजारात विक्रेत्यांकडून बऱ्याचदा पैसे कमी केले असणार. आपण त्यासाठी कधीकधी विक्रेत्याकडे खोटं देखील बोलतो की, अरे तो बाजूचा दुकानवाला तर मला इतक्या रुपात देत होता, किंवा त्यादिवशी मी विकत घेतलं ऐवढ्य रुपयांतच मिळालं होतं. हे सगळ तर आपण बोलतोच. परंतु अशा प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.  जे पाहून तुम्हाला या माणसाची ट्रिक नक्की आवडेल.

त्याने केळ्यांची किंमत कमी करण्यासाठी जे काही डोकं लावलं आहे ते ऐकून तुम्ही म्हणाल की, याला तर 21 तोफांची सलामी द्यावीशी वाटेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ग्राहक केळीवाल्याच्या दुकानातून त्याच्या न कळत डझनभर केळी उचलून घेतो आणि फळांच्या दुकानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण तोपर्यंत फळ विकणारा व्यक्ती त्या ग्राहकाला थांबवतो आणि विचारतो की, तुला काय हवे आहे? तेव्हा ती व्यक्ती म्हणते, "ती केळी कितीला दिली?" तेव्हा दुकानदार म्हणतो, "50 रुपये डझन." त्यावर ग्राहक म्हणतो की, "शेजारी गंगाराम ही केळी 30 रुपयांना देण्यास तयार आहे."

तर त्यावर दुकानदार म्हणतो की, "ही केळी खूप जास्त पिकलेली आहेत अशी केळी तर मी 10 रुपये डझनला विकेन." यानंतर, ग्राहक दुकानदाराच्या हातात 10 रुपये ठेवतो आणि म्हणतो की, "हे घे मग 10 रुपये मी ही केळी तुझ्याच दुकानातुन घेतली आहेत." त्यानंतर त्या फळ विक्रेत्याचं तोंड पाहाण्यसारखं झालं होतं, त्याला वाटलं असेल की, कुठल्या कुठे मी हे बोललो आणि आता फसलो.

सोशल मीडियावर हा खोडसाळ व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. यामुळे या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियेचा पाऊस पडत आहे. एका यूझरने सांगितले की, 'मी पहिल्यांदाच सूट मागण्यासाठी असा चोरटा मार्ग पाहिला आहे.' दुसरीकडे, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, 'याला तर 21 तोफांची सलामी दिली पाहिजे.' या व्यतिरिक्त, इतर अनेक यूझर्सने त्या व्यक्तीच्या युक्तीची आणि मेंदुची प्रशंसा केली आहे.