नाशिक : शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी नाशिक शहरात पावसाचे पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. पावसाळयापूर्वी नाशिक मनपा प्रशासनाने जवळपास ८० टक्के काम पूर्ण केले आहे. याशिवाय सात आपत्कालीन कक्ष आणि पथके तयार केलीय त्यामुळे यंदाच्या वर्षी २७ मिमी पर्यंत पाऊस आला तरी पाणी तुंबणार नाही, असा दावा मनपा प्रशासनाने केलाय.
नाशिकमध्ये तर पालिकेच्या प्रवेश्व्द्वारावरच नालेसफाई न झाल्याने पाणी साचत असते. याशिवाय अशोक स्थंभ, उंटवाडी, सारडा सर्कल, पाइपलाइन रोड याशिवाय नाशिकरोड रेल्वे स्थानक या काही ठिकाणी तर वर्षानुवर्षे पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना आहेत. मात्र यंदाच्या वर्षी नाशिक पालिकेने नालेसफाई, अंतर्गत गटारी यांचेवर लक्षकेन्द्रित करत ८० टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केलाय. उर्वरित काम पाऊस पडल्यावर केले जाणार असून यंदा आपत्ती ओढवणार नाही असा दावा केला आहे.