Maharashtra Weather : राज्यात आणखी दिवस थंडीचा कडाका, या जिल्ह्यात 15 दिवसांपासून नीचांकी तापमान

Maharashtra Weather  : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. आणखी काही दिवस राज्याभरात हुडहुडी कायम राहणार आहे. 

Updated: Jan 18, 2023, 10:05 AM IST
Maharashtra Weather : राज्यात आणखी दिवस थंडीचा कडाका, या जिल्ह्यात 15 दिवसांपासून नीचांकी तापमान  title=

Weather Forecast Maharashtra : राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. आणखी काही दिवस राज्याभरात हुडहुडी कायम राहणार आहे. (Weather News Updates) उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात (Maharashtra) जानेवारी महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तापमानाचा पारा घसरला आहे. ( Weather News in Marathi) कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या सर्वच भागातील शहर आणि जिल्ह्याच्या किमान तापमान सरासरीपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसनं कमी झालंय. गेल्या 15 दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्याचं तापमान नीचांकी असल्याचं दिसून आले. 

दिवसभरात नाशिक शहरात किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस, जळगाव शहरात किमान तापमानाची 10.3 अंश सेल्सिअस एवढी नोंद करण्यात आली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस राज्याच्या सर्वच भागात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. जानेवारी महिन्याच्या 2 ते 3 जानेवारीपासून उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहराचे किमान तापमान 7 ते 9 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा तीने ते चार अंशानी उणे राहीले आहे. तर  रत्नागिरी 16.6, नांदेड 16.7, कोल्हापूर 16.9, अकोला 17.1, चंद्रपूर 17.6 आणि मुंबई 18.0 इतके तापमान आहे.

मुंबईतला गारवा हळूहळू कमी होणार 

थंडीमुळे मुंबईकरांनी कपाटातून बाहेर काढलेले स्वेटर्स, जॅकेट पुन्हा कपाटात जाण्याची शक्यता आहे. (Weather Forecast Mumbai) कारण मुंबईतला गारवा हळूहळू कमी होणार आहे. उत्तरेतल्या शीतलहरींचा प्रभाव कमी होणार असल्यानं मुंबईतली थंडी कमी होणार आहे. किमान तापमान 15 ते 20 अंशादरम्यान राहण्याचा अंदाज आहे.  किमान तापमान घसरल्यानं मुंबईत गारेगार थंडीचा अनुभव येतोय. रविवारी मुंबईतलं किमान तापमान 13.8 अंशापर्यंत घसरलं होतं. पहाटे आणि रात्रीच्या वेळी मुंबईकरांना हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव येतोय. मात्र या वातावरणात हळूहळू बदल होणार आहे. 

 उत्तर भारतात थंडीसह पावसाची शक्यता

कडाक्याच्या थंडीचा सामना करणाऱ्या उत्तर भारतातील लोकांवर थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आणखी पाकिस्तानमार्गे वायव्य भारताच्या दिशेने थंड वारे येत आहेत. 21 ते 25 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात हा त्रास कायम राहील. यामुळे दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. यासोबतच ताशी 50 किमी वेगाने वाहणारे थंड वारे नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ करणार आहेत. 

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये अलर्ट  

18 ते 25 जानेवारी दरम्यान राज्यात मुसळधार हिमवृष्टीचा अंदाज लक्षात घेता लडाख तसेच जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. जेणेकरून कोणत्याही अनुचित घटनेची माहिती मिळताच तातडीने बचावकार्य सुरु करता येईल. यासाठी आपत्ती निवारण पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.