Panipuri Viral Video : तुम्ही खाताय डर्टी पुरी? एकदा 'हा' किळसवाणा व्हिडीओ एकदा पाहाच!

Weird News Of Panipuri : तुम्ही पाणीपुरी खाताय तर सावधान! पाणी पुरी बनवताचा एक खळबळजनक व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झालाय.

Updated: Dec 2, 2023, 09:41 PM IST
Panipuri Viral Video : तुम्ही खाताय डर्टी पुरी? एकदा 'हा' किळसवाणा व्हिडीओ एकदा पाहाच! title=
Weird News Of Panipuri Viral Video

Panipuri Viral Video : तुम्ही जर पाणीपुरी (Panipuri) लव्हर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. घामाघूम झालेले तरूण तुम्ही चवीनं जी पाणीपुरी खाता त्याच्या पुरीचं पिठ मळतायत. घामानं थबथबलेले, अर्धनग्न, अंग खाजवत हे कामगार पायानं पीठ मळतायंत. यात काही बालकामगार ही दिसून आलेत. ही किळवसवाणी दृश्य भाईंदरमधली आहेत. भाईंदर पश्चिमेच्या आझाद नगर भागात एका कारखान्यात अत्यंत अस्वच्छ पद्धतीनं पुऱ्या बनवल्या जात असल्याचं मनसैनिकांना समजलं. मनसैनिकांनी कारखान्यावर धाड टाकली आणि अस्वच्छतेचा पर्दाफाश केला. कुणालाही किळस येईल असा प्रकार सुरु होता. मनसे कार्यकर्त्यांनी (MNS Worker) याबाबतची तक्रार दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं कारखान्याला सील ठोकलं. 

तसं पाहिलं तर डर्टी पाणीपुरीचा (Weird Panipuri) हा पहिलाच प्रकार नाही. याआधी मुंबई, ठाणे, नाशिकमध्येही असे किळसवाणे प्रकार समोर आले आहेत. मात्र थातूरमातूर कारवाईपलीकडे काहीच झालेलं नाही. पाणीपुरी विकणारे आणि पाणीपुरी बनवणाऱ्यांचे यापूर्वीही अनेक कारनामे उघड झालेत. एफडीएनं पाणीपुरी तयार करणारे आणि पाणीपुरी विकणाऱ्यांसाठी कठोर नियमावली बनवण्याची गरज आहे. जोपर्यंत कठोर नियम करत नाही तोपर्यंत सामान्यांना डर्टी पाणीपुरीच खावी लागणार आहे.

पाहा Video

दरम्यान, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरी आवडते. पाणीपुरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मात्र, तुमच्या आरोग्यावर परिणाम करणारी पाणीपुरी खावी की नको? हे तुम्हीच ठरवा. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कारवाई मागणी देखील केली आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x