नंदुरबारमधील मानाच्या पाचही बाप्पांचं उत्साहात स्वागत

संबळच्या तालावर लयबद्ध नाचने हे नंदुरबारमधील खास आकर्षण 

Updated: Sep 2, 2019, 04:38 PM IST
नंदुरबारमधील मानाच्या पाचही बाप्पांचं उत्साहात स्वागत

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नंदुरबार शहरातील मानाच्या पाचही गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली. मानाचा दादा आणि बाबा गणपतीची रथावर स्थापना करण्यात येते. या वर्षी मनाच्या गणपतीवर सोने चांदीच्या दागिन्यांचा साज चढविण्यात आला आहे. हे मनाचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते स्वतः रथावर कळ्यामातीपासून ही मूर्ती तयार करीत असतात शहरातील मानाच्या गणपतीची स्थापना झाल्या नंतर इतर सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या स्वागत मिरवणुकांना सुरुवात होत असते. 

मोठ्या भक्ती पूर्व वातावरणात आज मनाच्या दादा ,बाबा ,तात्या,काका,मामा या गणरायांची स्थापना झाली. सकाळ पासुन घरगुती गणरायाच्या खरेदी साठी अबाल वृद्धांची गर्दी दिसून आली आहे. तर मंडळ आणि तालीमांनीही पारंपारीक ढोल ताशाच्या नृत्यावर आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले आहे. 

संबळच्या तालावर लयबद्ध नाचने हे नंदुरबारमधील खास आकर्षण असून येथील वैशिष्टपूर्ण गोफ नृत्य देखील अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. आणखीन पुढील दहा दिवस गणरायाच्या भक्तीत तरुणाई तल्लीन राहणार असल्याचे चित्र दिसुन येणार आहे.