जगभरात दृष्टीदोष असलेल्यांपैकी 'इतके' भारतातच, काय आहे मोबाईल व्हिजन सिंड्रोम?

Mobile Vision Syndrome: सततचा मोबाईल वापर डोळ्यांसाठी मारेकरी ठरतोय. कॉम्प्युटरवर खूप काम करत असताना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार बळावतोय.

Updated: Oct 10, 2024, 02:55 PM IST
जगभरात दृष्टीदोष असलेल्यांपैकी 'इतके' भारतातच, काय आहे मोबाईल व्हिजन सिंड्रोम? title=
मोबाईल व्हिजन सिंड्रोम

विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर: मोबाईलचा वापर जसा जसा वाढत चाललाय तसा तसा दृष्टीमध्ये अधुता येण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. एका सर्व्हेनुसार, देशभरात जगभरात जितक्या लोकांमध्ये दृष्टीदोष आहे त्यापैकी एक तृतीयांश लोक हे भारतातले आहेत. म्हणजे येत्या काळात भारतीय लोकसंख्येच्या 70 ते 80 टक्के लोकांना चश्मा असेल असं सांगण्यात येतय. जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

सततचा मोबाईल वापर डोळ्यांसाठी मारक

सततचा मोबाईल वापर डोळ्यांसाठी मारक ठरतोय. कॉम्प्युटरवर खूप काम करत असताना कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार बळावतोय. यासोबतच आता मोबाईल व्हिजन सिंड्रोम हा आजार बळावू लागलाय.दोन्ही आजारात एकाच प्रकारचे साम्य आहे. म्हणजे स्क्रीनवर सात ते आठ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्यांमध्ये हा आजार दिसून येतो. यातून डोळ्यातून कमी दिसणं डोळे कोरडे पडणे अधूता येणे असले प्रकार वाढत चाललेले आहेत. 

या आजाराला वयाचं बंधन नाही

महत्त्वाचं म्हणजे या आजाराला वयाचं बंधन नाही. अगदी 5 वर्षाच्या मुलापासून ते 70 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनाच या आजारांने ग्रासले आहे. दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काही मोडके नियम पाळले तरी तुमचे डोळे सुरक्षित राहू शकतात. डोळे विकार तज्ञ डॉ. राजीव मुंदडा यांनी यासंदर्भात माहिती दिली.

काय काळजी घ्याल?

5 ते 6 तासांपेक्षा जास्त स्क्रीन टाईम तुमचे डोळे खराब करतोय आणि हे तुमच्या लक्षातही येत नाहीय. यासोबत तुमच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतोय. काहीही लक्षात न राहणं, मेमरी लॉस होणं, नैराश्य येणे असेल अनेक प्रकार या माध्यमातून वाढल्याचे मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.

डोळ्यांच्या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतात

एका रिपोर्टनुसार, जगभरातील डोळ्यांच्या रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण भारतातले आहेत. म्हणजे येत्या 20 वर्षांच्या काळात प्रत्येक दुसऱ्या भारतीयाला चष्मा दिसेल असं भाकीत आहे. हे जर थांबवायचं असेल तर काही नियम स्वतःला लावावे लागतील. स्क्रीन टाईम कमी करावा लागेल. नाहीतर तरुणांचा देश अशी ओळख असण्यासोबत सर्वाधिक चष्मे घालणाऱ्यांचा देश अशी काहीशी प्रतिमा भारताची निर्माण होईल, अशी भीती वर्तवण्यात येत आहे.डोळ्यांना जपा आणि डोळे सुदृढ ठेवा, असे आवाहन जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने करण्यात येतंय.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x