यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख

Who Is Kalavati Bandurkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राहुल गांधींवर निशाणा साधताना महाराष्ट्रातील या महिलेचा उल्लेख थेट अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान केला. अमित शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना ज्या महिलेचं नाव घेतलं ती आहे तरी कोण आणि त्या अचानक चर्चेत का आलेल्या पाहूयात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 10, 2023, 09:23 AM IST
यवतमाळमधील कलावती बांदूरकर आहेत तरी कोण? शाहांनी राहुल गांधींवर टीका करताना केला उल्लेख title=
बुधवारी संसदेमधील चर्चेदरम्यान अमित शाहांनी कलावती यांचा उल्लेख केला

Who Is Kalavati Bandurkar: महाराष्ट्रातील जलन्यामधील एका गरीब विधवा महिला शेतकऱ्याचा उल्लेख बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये केला. या महिलेचं नाव आहे, कलावती बांदूरकर! अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना अमित शाह यांनी कलावती यांचा उल्लेख करताना राहुल गांधींना लक्ष्य केलं. 2008 साली महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये यवतमाळमधील कलावती यांच्या पत्नीने आत्महत्या केली. यानंतर राहुल गांधींनी कलावती यांना आधार देण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली. 

काय म्हणाले अमित शाह कलावती यांचा उल्लेख करत

लोकसभेमध्ये वायनाडचे काँग्रेसचे खासदार असलेल्या राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी कलावती यांचा उल्लेख केला. "या संसदेमध्ये असा एक सदस्य आहे ज्यांना 13 वेळा राजकारणामध्ये लॉन्च करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ते 13 वेळा अयशस्वी ठरलेत. कलावती नावाच्या एका गरीब महिलेला भेटण्यासाठी ते तिच्या घरी गेले होते तेव्हाची लॉन्चिंग मी पाहिली होती. मात्र त्यांनी किंवा काँग्रेसने त्या गरीब महिलेला काय दिलं? घर, राशन, वीज, गॅस, शौचालय हे सारं त्या महिलेला मोदी सरकारकडून मिळालं," असं शाह म्हणाले.

30 लाखांची मदत 25 हजारांचं व्याज

सन 2008 साली संसदेमधील चर्चेमध्ये राहुल गांधींनी कलावती बंदुरकर यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर त्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा चेहरा म्हणून कलावती या देशभरामध्ये चर्चेत आल्या. रागुल गांधींनी कलावती यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर सुलभ इंटरनॅशनलने या महिलेला 30 लाखांची मदत केली होती. हे पैसे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मरागाव शाखेमधीली कलावती यांच्या फिक्स डिपॉझिटवर जमा करण्यात आला. या पैशांवर मिळणाऱ्या महिना 25 हजार व्याजाच्या मदतीने कलावती यांनी त्यांच्या 4 मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. 

निवडणूक लढणार होत्या पण...

2019 मध्ये पुन्हा एकदा बातमी समोर आली की कलावती यांच्या जावयाने घेतलेलं कृषी कर्ज फेडता आलं नाही म्हणून आत्महत्या केली. एका स्थानिक बिगरसरकारी संथ्येच्या अध्यक्षाने दिलेल्या माहितीनुसार, अवकाळी पावसामुळे संजय कदस्कर यांनी 4.5 एकरांमध्ये लावलेलं पिक उद्धवस्त झालं. त्यामुळे संजय यांनी रिक्षासाठी घेतलेलं कर्ज त्यांना फेडता आलं नाही. त्यामुळेच त्यांनी स्वत:ला संपवलं. कलावती यांचे पती परशुराम यांनीही शेतीसंदर्भातील समस्यांना कंटाळून आपलं आयुष्य संपवलं. कलावती यांनी 2009 साली महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.

पती, जावई आणि मुलीची आत्महत्या, गडकरींनीही देऊ केलेली मदत

विदर्भ जनआंदोलन या सेवाभावी संस्थेनं त्यावेळी कलावती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. "त्यांच्या जावयाने धमकी दिली होती की, तुम्ही जर विधानसभेच्या निवडणूक लढल्या तर मी आत्महत्या करेन," असा दावा या संस्थेनं केला होता. सन 2011 मध्ये कलावती यांची 27 वर्षीय विवाहित मुलगी सविता खमणकरनेही आत्महत्या केली. चंद्रपूरमधील वरोराजवळच्या राडेगाव येथे राहणाऱ्या सविताने स्वत:ला जाळून घेतलं. त्यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कलावती यांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली होती. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कलावती राहुल गांधींना भारत जोडो यात्रेदरम्यान पुन्हा भेटल्या होत्या. स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या वाशिममधील राहुला गांधीच्या सभेला आल्या होत्या.