Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 22, 2024, 05:03 PM IST
Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण? title=
Who Is Vishal Agarwal Father Of Pune Porsche Accident 17 years old boy

Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणावरुन महाराष्ट्रातून मोठा संताप व्यक्त होत आहे. 17 वर्षांचा मुलगा दारुच्या नशेत पोर्शे कार चालवत होता. भरधाव वेगाने कार चालवत असतानाच त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. तसंच, घटनेनंतर 15 तासांतच मुलाला जामीन मिळाल्याने संताप व्यक्त होतोय. अशातच पोलिसांनी आता मुलाच्या वडिलांवर कारवाई केली आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत आणि त्यांची संपत्ती किती, याविषयी सविस्तर जाणून घ्या. 

कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन असताना मुलाला गाडी चालवण्यास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवाल यांना संभाजीनगरमधून गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलं. त्याचपबरोबर, अपघात प्रकरणी हॉटेल मालक आणि व्यवस्थापकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यावेळी विशाल अग्रवाल यांना 24 मेपर्यंत दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव विशाल अग्रवाल आहे. पुण्याच्या रिअर इस्टेट सेक्टरमधील हे मोठं नाव आहे. तर, त्यांच्या कंपनीचे नाव ब्रह्मा कॉर्प आहे. या कंपनीची सुरुवात विशाल अग्रवालच्या आजोबानी केली होती. पण जेव्हा पासून विशाल यांच्या हातात कंपनीची सूत्र आली तेव्हापासून कंपनीला यश मिळत गेले. या कंपनीच्या अनेक सबसिडरी कंपन्यादेखील आहेत. कंपनीने अनेक मोठे प्रकल्प केले आहेत. फाइव्ह स्टार हॉटेल ते वडगाव शेरी, खराडी, विमान नगर परिसरात मोठे हाउसिंग प्रकल्प बनवले आहेत. पुण्यात ली मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब सारखे मोठे प्रकल्प या कंपनीने केले आहेत. 

ब्रह्मा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत दोन हजाराहून अधिक इमारती बांधल्या आहेत. पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रकल्प ब्रह्मा कोर्पचा आहे. 2003 साली हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मा कॉर्पचे नाव पुण्यात प्रसिद्ध झाले. कल्याणीनगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रकल्प आहेत. 

ब्रह्मा कंपनीची एकूण नेट वर्थ अब्जोवधींच्या घरात आहे. तर आत्ता विशाल अग्रवाल यांच्याकडे एकूण 601 कोटींची संपत्ती आहे. तसंच, अनेक लक्झरी कारचा ताफा आहे आहे. यातीलच एक लक्झरी कार अल्पवयीन मुलाला दिली होती. तर, ज्याच्याकडून अपघात घडला आहे तो बिल्डरचा लहान मुलगा आहे तर, विशाल अग्रवाल याला आणखी एक मोठा मुलगा आहे.