पत्नी आणि लेकीकडून प्राचार्याची हत्या

या प्रकरणी प्राचार्य वानखेडे यांच्या पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली वानखेडे यांना अटक करण्यात आली.  

Updated: Nov 4, 2017, 03:26 PM IST
पत्नी आणि लेकीकडून प्राचार्याची हत्या title=

नागपूर : नागपुरातील प्राचार्य महेश वानखेडे हत्येप्रकरणी खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणी प्राचार्य वानखेडे यांच्या पत्नी अनिता वानखेडे आणि मुलगी सायली वानखेडे यांना अटक करण्यात आली.  

प्राचार्य महेश वानखेडे यांच्या तापट स्वभावाला कंटाळून, या माय-लेकी दिली पित्याच्या हत्येची सुपारी दिलीय. याप्रकरणी या दोघींसह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे.