मुंबई : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द (SSC Exam Canclled) केली आहे. यानंतर अकरावी प्रवेश कसा देणार ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आणखी एक महत्वाचा प्रश्न राज्य सरकारला विचारला जातोय. दहावीची परीक्षा रद्द केल्यानं आता परीक्षेसाठी घेतलेले ७० कोटी रुपये परत देणार का? असा सवाल पालकवर्गाने केलाय.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी भरली होती. काही दिवसांवर त्यांची परीक्षा होती. पण वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
शिक्षण मंडळाकडून जमा रकमेचा विनीयोग कुठे होणार ? याची किमान माहिती द्या, अशी मागणी पालकांनी केलीय.
राज्यातील नऊ विभागीय मंडळाकडून 16 लाख 206 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. परीक्षार्थींकडून 415 रुपये परीक्षा शुल्क घेतले आहे.
दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. १०वी ची परीक्षा रद्द करण्यात आली असून इंटर्नल असेसमेंट बाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच 12 वी ची परीक्षा होणार आहे.