यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे, महिला वर्ग आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक होत आहे.

Jaywant Patil Updated: Mar 12, 2018, 11:31 PM IST
यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव title=

यवतमाळ : यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे, महिला वर्ग आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक होत आहे. त्यातूनच यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार आणि खासदार भावना गवळी यांना घेराव घालून पाणी प्रश्न सुटणार की नाही असा सवाल केला. 

प्राधिकरण कार्यालयावर महिलांचे मोर्चे

रोज जीवन प्राधिकरण कार्यालयावर महिलांचे मोर्चे धडकत असल्याने, पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. याचवेळी महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. 

महिला तब्बल दोन तास ताटकळल्या

पाणी कधी मिळणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी महिला तब्बल दोन तास ताटकळत होत्या. सुरुवातीला महिलांनी खा. भावना गवळी यांना घेराव घालून पाण्याची मागणी लावून धरली. आगामी काळात पाणीप्रश्न आणखी उग्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x