close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विठ्ठलाचे शॉर्टकर्ट दर्शन घडवणाऱ्या दलालाला अटक

विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेणारी टोळी मंदिर परिसरात कार्यरत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती.

Updated: Aug 31, 2018, 08:07 PM IST
विठ्ठलाचे शॉर्टकर्ट दर्शन घडवणाऱ्या दलालाला अटक

सोलापूर: पंढरपूरच्या विठुरायाचे शॉर्टकर्ट मार्गाने दर्शन घडवणाऱ्या दलालांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी कैलास डोके या दलालावर गुन्हा दाखल केला. 

विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेणारी टोळी मंदिर परिसरात कार्यरत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. यानंतर पोलीस सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. अखेर हैदराबाद येथून आलेल्या भाविकांकडून काहीजण पैसे घेत असताना पोलिसांना शंका आली. त्यावेळी पोलिसांनी लगेच कैलास डोके या व्यक्तीला ताब्यात घेतले. यानंतर आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.