टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांच्या बसला अपघात, चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

मुंबईहून वेरूळला निघालेल्या या बसमध्ये एकूण ४० डॉक्टर होते.

Updated: Sep 1, 2018, 06:13 PM IST
टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांच्या बसला अपघात, चालक ठार, ३० डॉक्टर जखमी

अहमदनगर: मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा शनिवारी पहाटे अहमदनगरमध्ये अपघात झाला. यामध्ये बसचालक जागीच ठार झाला तर अन्य ३० डॉक्टर जखमी झाले आहेत. जखमींना अहमदनगरमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नगर-औरंगाबाद महामार्गावर केडगाव बायपासजवळ व्होल्वो आणि कंटेनरची धडक होऊन हा अपघात झाला.  मुंबईहून वेरूळला निघालेल्या या बसमध्ये एकूण ४० डॉक्टर होते. औरंगाबादमध्ये होणाऱ्या एका परिषदेसाठी ते निघाले होते. 

या भीषण अपघातामध्ये अर्ध्या लक्झरीचा चक्काचूर झाला. डॉ. पुष्कर इंगळे, अनिल टिबडेवाल, जानी कार्टन हे तीन डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. अन्य डॉक्टर किरकोळ जखमी झाले आहेत.