गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी?

Godrej Group Will Be Split In 2 Groups: आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू जमशेद गोदरेज या दोघांमध्ये कंपन्यांचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती कुटुंबाने संयुक्तरित्या जारी केलेल्या एका पत्रकात दिली आहे. कोणाला कोणत्या कंपन्यांची मालकी मिळणार पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: May 1, 2024, 09:35 AM IST
गोदरेज ग्रुपचे 2 तुकडे होणार! 2,43,712 कोटींचं असं होणार वाटप; कोणाला मिळणार कोणती कंपनी? title=
कंपनीनेच दिली यासंदर्भातील माहिती

Godrej Group Will Be Split In 2 Groups: देशातील आघाडीच्या उद्योजकांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबामध्ये संपत्तीचं वाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वाटपामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हातपाय पसरलेला गोदरेज उद्योज समूह 2 भागांमध्ये वाटला जाणार आहे. अगदी रिअर इस्टेट पासून ते कस्टमर प्रो़क्ट्सपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गोदरेज समुहाचे 2 भाग होणार आहेत. आदी गोदरेज आणि त्यांचे चुलत बंधू जमशेद गोदरेज या दोघांमध्ये कंपन्यांचं वाटप केलं जाणार आहे.

कंपनीने काय माहिती दिली?

गोदरेज समुहाच्या कंपन्यांनी मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांचं नेतृत्व करणारे प्रवर्तक (प्रमोटर) आदी गोदरेज, नादीर गोदरेज, जशेद गोदरेज आणि स्मिता गोदरेज कृष्णा यांनी एक संयुक्त पत्र स्टॉक एक्सचेंजला पाठवलं आहे. या पत्रामध्ये सर्वानुमते कुटुंबाने फॅमेली सेटलमेंट अ‍ॅग्रीमेंट (एपएसए) मान्य केलं असून कंपन्यांचं वाटप कसं केलं जाणार आहे याची माहितीही दिली आहे.

आदी गोदरेज यांच्याकडे कोणत्या कंपन्या राहणार?

कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या एकमतानुसार, गोदरेज इंटस्ट्रीज ग्रुप (GIG) अंतर्गत येणाऱ्या गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कस्टमर प्रोडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट अ‍ॅण्ड अ‍ॅस्टीक लाइव्हसायन्सेस, इनोव्हिया मल्टीव्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, गोदरेज सिड्स अ‍ॅण्ड जेटेटिक्स, अनामुदी रिअल इस्टेट या कंपन्या नादीर गोदरेद, आदी गोदरेज कुटुंबाकडे असतील. आदी गोदरेज यांचा पुत्र फिरोजशा गोदरेज हे गोदरेज इंटस्ट्रीज ग्रुपचे एक्झिक्युटीव्ह व्हॉइस चेअरपर्सन असतील. ते ऑगस्ट 2026 मध्ये नादीर गोदरेज यांचयाकडून पदभार स्वीकारतील. जीआयजीअंतर्गत येणाऱ्या जवळपास सर्व कंपन्या या लिस्टेट कंपन्या आहेत.

नक्की वाचा >> हा 26 वर्षीय भारतीय 400 कोटींचा मालक! फक्त कंप्युटर, इंटरनेट कनेक्शनच्या जोरावर मिळवलं यश

जमशेद गोदरेज यांना कोणत्या कंपन्या मिळणार?

दुसरीकडे गोदरेज इंटप्रायझेस ग्रुप (GEG) कंपन्यांपैकी अनलिस्टेड कंपन्यांच्या यादीमध्ये गोदरेज अ‍ॅण्ड बॉइज मॅनफॅक्चरिंग कंपनी, गोदरेद होलडिंग्स प्रायव्हेट लिमिटेड, गोदरेद इन्फोटेक लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपकंपन्यांसहीत जॉइण्ट व्हेंचरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या तसेच आरकेएनई इंटरप्रायझेससारख्या कंपन्या जमशेद गोदरेद यांच्याकडे असतील. या कंपन्यांच्या चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी जमशेद गोदरेज यांच्याकडेच असेल. तर नियारिका होळकर एक्झिक्युटीव्ह डारेक्टर असतील. द गोदरेज इंटप्रायझेस ग्रुपमध्ये येणाऱ्या कंपन्या हवाई क्षेत्र, नागरी उड्डाण, संरक्षण, आयटी, सॉफ्टवेअर, बांधकाम यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.

नक्की वाचा >> रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट!

कंपन्यांची एकूण किंमत  2,43,712 कोटी रुपये; सर्वात महागडी कंपनी कोणती?

30 एप्रिलच्या आकेडवारीनुसार गोदरेज इंडस्ट्रीजची किंमत 32,344 कोटी इतकी आहे. गोदरेज प्रॉपर्टीजची किंमत 73,641 कोटी इतकी आहे. गोदरेज अॅग्रोव्हेटची किंमत 10,469 कोटी इतकी आहे. तर सर्वाधिक किंमत गोदरेज कस्टमरची असून ती 1,24,733 कोटी इतकी आहे. अ‍ॅस्टीक लाइफसायन्स कंपनीचं मूल्य 2,525 कोटी इतकं आहे. सर्व कंपन्यांचं एकत्रित मूल्य 2,43,712 कोटी रुपये इतकं असून या एवढ्या अवाढव्य मूल्य असलेल्या कंपन्यांचं एकमताने वाटप केलं जाणार आहे.