मुंबई : महाविकासआघाडीने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर दिली आहे. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. तर आठड्यातून दोन दिवस सुट्टी असणार आहे. २९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणारे आहे.
२९ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये पाचच दिवस सुरू राहणार आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना एक दिवसाच्या जादा सुट्टीच्या बदल्यात रोज ४५ मिनिटे अधिक काम करावं लागणार आहे. त्यामुळे आता कामाची वेळ सकाळी ९.४५ वाजल्यापासून सव्वा सहा वाजेपर्यंत असणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सोमवार ते शुक्रवार काम करावं लागणार आहे. शनिवार आणि रविवार त्यांना सुट्टी असणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतं आहे. देशात अनेक खासगी कंपन्यांमध्ये ५ दिवसांचा आठवडा आहे. पण त्यांच्याकडून ९ तास काम करुन घेतलं जातं. तर काही कंपन्यांमध्ये ८ तास काम करावं लागतं.
याधी सरकारी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. पण सरकारने कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे.