बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग

अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.  

Updated: Jul 11, 2020, 09:05 AM IST
बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग

मुंबई : बोरिवलीत शॉपिंग सेंटरला आग भीषण आग लागली आहे. शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास ही लागल्याचे आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनच्या १४ गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. आग लागण्याचे खरे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आग भीषण स्वरूपाची असल्यामुळे परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर काळा धूर या परिसरात पसरला आहे. 

या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. ही भीषण आग लेव्हल ४ची असल्याचे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शॉपिंग सेंटरला आग लागल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत काय आणि किती नुकसान झाले याचा तपशिल अद्याप मिळू शकलेला नाही.