शिवसेनेत आता 'आदित्य'निष्ठा? 'सामना'तली जाहिरात बघितली का?

शिवसेनेत स्वामिनिष्ठेचा नवा नमुना पाहावयास मिळतोय.

Updated: Jun 13, 2018, 05:36 PM IST

मुंबई : शिवसेनेत स्वामिनिष्ठेचा नवा नमुना पाहावयास मिळतोय. शिवसेनेचे नवनियुक्त नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुखपत्र 'सामाना'त आज दिलेली शुभेच्छा जाहिरात अत्यंत बोलकी आहे. मुखपत्राचं मुखपृष्ठ या जाहिरातीनं व्यापले असून त्यात आदित्य ठाकरे यांची तुलना सूर्यदेवाशी करण्यात आलीय. जाहिरातीत आदित्यह्रदय स्तोत्राला ठळकपणे स्थान देण्यात आलंय. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव 
ठाकरे यांच्यानंतर पक्षामध्ये आदित्य ठाकरे हे दुसरं सत्ताकेंद्र बनल्याचं मानलं जातं आहे.