आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार

Updated: Aug 31, 2019, 12:00 AM IST
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार  title=

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती सुत्रांनी 'झी २४ तास'ला दिली आहे. वरळीतील पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक झाली असून त्यामध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेनेतर्फे मतदार संघाची चाचपणी सुरु होती. राज्यभरातीन शिवसेनेच्या अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना आपल्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती.