ड्रग्ज कनेक्शन । अटकेनंतर शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह आणखी दोघांची कोविड-१९ची चाचणी

 रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले. आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने अटक केली. 

Updated: Sep 5, 2020, 10:51 AM IST
ड्रग्ज कनेक्शन । अटकेनंतर शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडासह आणखी दोघांची कोविड-१९ची चाचणी title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव पुढे आले. आता रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी एनसीबीने अटक केली. आज दोघांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दोघांनाही एनसीबीच्या ऑफीसमधून बाहेर घेऊन जाण्यात आले. पहिल्यांदा त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात येणार असून नंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

शोविक आणि सॅम्युअल मिरांडाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशीसाठी काल सकाळी ताब्यात घेतलं होतं. चौकशीअंती दोघांना अटक करण्यात आली. तर रिया चक्रवर्तीलाही आज अटक होण्याची शक्यता आहे. सुशांत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज कनेक्शनबाबत एनसीबीचा तपास सुरू आहे. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे ड्रग्ज तस्करांशी संबंध उघड झाले होते. दरम्यान, झैद, कैझन इब्राहिम यांचीही कोरोना विषाणू चाचणी करण्यात येणार आहे.

रिया-शोविकचे ड्रग्जप्रकरणात व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. झैद, अब्दुल परिहार, कैजान, अब्बास लखानी, करण अरोरा, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा या तास जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यापैकी अब्बास लखानी आणि करण खरोरा यांना जामीन मिळाला आहे.