महाराष्ट्रातल्या वहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

'होम मिनिस्टर' आदेश बांदेकरांना मंत्रीपदाचा दर्जा

Updated: Jun 18, 2018, 08:47 PM IST

मुंबई : होम मिनिस्टर मालिकेतून घराघरात पोहोचलेले आणि शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आदेश बांदेकर हे मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आहेत. न्यासाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा मिळणार आहेत.

शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर आदेश बांदेकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१४ पासून भाजप आणि शिवसेनेचे संबंध कायमच ताणले गेले होते. या संबंधांमध्ये सुधार व्हावा आणि २०१९ साठी भाजप-शिवसेनेची युती व्हावी यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

यानंतर आता आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता तरी भाजप-शिवसेनेचे संबंध सुधारणार का हे पाहावं लागणार आहे. 

आदेश बांदेकर यांना मिळणार या सुविधा