close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इंजीनीअरींग पाठोपाठ आयआयटीमध्येही जागा रिक्त ?

 आयआयटीमध्येही प्रवेशाच्या तीन फेऱ्यांनंतर काही जागा रिक्त राहत असल्याचे समोर आले आहे. 

Updated: Jul 12, 2019, 01:45 PM IST
इंजीनीअरींग पाठोपाठ आयआयटीमध्येही जागा रिक्त ?

दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई :  राज्यभरात इंजिनिअरींग आणि आयआयटीचे प्रवेश सुरु आहेत. पण एकेकाळी प्रचंड मागणी असलेल्या इंजिनिअरींग या क्षेञात यंदा मोठे बदल दिसून येतायत. देशात टेक्नाँलाँजीसाठी सर्वोत्तम संस्था समजल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टीट्यूट आँफ टेक्नाँलाँजी म्हणजेच आयआयटीमध्येही प्रवेशाच्या तीन फेऱ्यांनंतर काही जागा रिक्त राहत असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात अभियांञीकी,पाँलीटेक्नीक या सर्वच क्षेञात प्रवेशाच्या शेकडो जागा रिक्त राहतायत. जाँईंट सीट अलोकेशन आँथोरीटीकडून देशभरातील आयआयटी प्रवेशासाठी तीसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आयआयटीमध्ये 18 जागा रिक्त राहील्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत रिक्त जागांची संख्या कमी असून गेल्या वर्षी आयआयटी संस्थांमध्ये 96 जागा रिक्त होत्या तर 2017 मध्ये 121 जागा होत्या. 

नव्याने स्थापन झालेले गोवा आणि धारवड आयआयटीत या जागा रिक्त राहत असल्याचीही शक्यता आहे. पण आयआयटी संस्थांमध्ये रिक्त जागांवरुन आता एचआरडी मंञालयाक़डूनही चींता व्यक्त केली जात आहे. 'चौथ्या गुणवत्ता यादीनंतर रिक्त राहीलेल्या 18 जागा भरण्यात आल्या आहेत. सातव्या फेरीपर्यंत आमच्याकडे एकही जागा रिक्त राहणार नाही अशी आम्हाला आशा आहे. नेमक्या कोणत्या कोर्सेसला कमी मागणी आहे किंवा कुणाला अधिक हे प्रवेश प्रक्रीया संपल्यावरच सांगता येईल असे सांगण्यात येत आहे. 

असे असले तरीही दूसऱ्या बाजूला राज्यातील इंजीनीअरींग महाविद्यालयांमध्ये हजारोच्या संख्येने रिक्त राहणाऱ्या प्रवेशाच्या जागा हा देखील मोठा प्रश्न आहे. गेले तीन वर्ष इंजीनीअरींग महाविद्यालयात जवळपास 70-80 हजार प्रवेश जागा रिक्त राहत आहेत. तर यंदा पदवीसाठीही गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी अर्ज सीईटी सेलला प्राप्त झाले आहेत. 

२०१७-१८  या वर्षात १४२७१९ इतक्या एकूण जागा होत्या तर ८०८३५ इतक्या रिक्त जागा होत्या. तर २०१८-१९ या वर्षात एकूण १२३५०९ जागा होत्या तर ७१९०० जागा रिक्त होत्या. मुंबई विद्यापीठाचे सीनेट सदस्य वैभव नरावडे यांनी यासाठी शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरले आहे. याला शिक्षण सम्राटच जबाबदार असल्याची टीका केली जातेय. परिस्थितीमुळेच गुणवत्ता शिक्षण न देणाऱ्या संस्था बंद करण्याची मागणी आता केली जातेय. इंजीनीअरींग शिक्षणाची ही दुरावस्था लवकरात लवकर सुधारण्याची गरज आहे. इंजीनीअरींगची पदवी हातात घेवून बाहेर पडलेले लाखे तरुण आज बेरोजगार आहेत. याचा सारासार विचार करत इंजीनीअरींग शिक्षणाकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे.