भाजपची माघार, लटके होणार आमदार... शिवसेनेने (SSUBT) मानले आभार

अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची माघार

Updated: Oct 17, 2022, 01:41 PM IST
भाजपची माघार, लटके होणार आमदार... शिवसेनेने (SSUBT) मानले आभार title=

Andheri By Election: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यश्र शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या परंपरेची आठवण करुन दिली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही भाजपला (BJP) पत्र लिहून विनंती केली होती. या विनंतीचा मान ठेवून भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. भाजपने ही परंपरा जपली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ही निवडणूक आता बिनविरोध होतेय, यावेळी अनिल परब यांनी शरद पवार आणि राज ठाकरे यांचेही आभार मानले.

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर ट्विस्ट
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri by Election) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रानंतर नवा ट्विस्ट आला होता. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिंदे गटाने केल्यानंतर आता भाजपने (BJP) या निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं सांगितलं. भाजप उमेदवार मुरजी पटेल (murji patel) यांचा अर्ज मागे घेत आहोत, तसंच मुरजी पटेल (murji patel) अपक्षही लढणार नाहीत, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. (BJP on withdraw its candidate in andheri east bypolls marathi news)

मुरजी पटेल यांनी 14 ऑक्टोबरला मोठं शक्तीप्रदर्शन करत ऋतुजा लटके यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राज्यातील राजकीय संस्कृती जोपासण्यासाठी भाजपवर उमेदवार मागे घ्यावा यासाठी दबाव वाढत होता. त्यानंतर आता भाजपने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.