Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Updated: Nov 6, 2022, 03:15 PM IST
Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला  title=

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय. ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) या 46 हजार 296 मतांनी विजयी झाल्यात. पण या मतमोजणीत खरा सामना रंगला तो ऋतुजा लटके आणि नोटाला मिळालेल्या मतांमध्ये. लटकेंना 19 व्या फेरीअखेर 66 हजार 247 मतं मिळाली. तर नोटाला त्याखालोखाल दुस-या पसंतीची 12 हजार 776 मतं मिळालीयत. पण दुसरीकडे इतर सर्व अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट मात्र जप्त झालंय. अपक्ष उमेदवारांच्या बेरजेपेक्षाही जास्त मतं ही नोटाला मिळालीत. दरम्यान ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झाल्यात.

 ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्या निकालाकडे लक्ष लागले होते. कारण उमेदवारी मिळाल्यानंतर मोठे राजकारण सुरु झाले होते. तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गटाची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे ठाकरेंसाठी हा पहिलाच निकाल अत्यंत महत्वाचा होता. मात्र, पहिला फेरीपासून आघाडी घेतलेल्या ऋतुजा लटके यांचा सामना हा 'नोटा'शी असल्याचे दिसून आले. तर अपक्ष उमेदवारांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान, भाजपनं माघार घेतल्यानं ऋतुजा लटकेंसमोर मोठं आव्हान नव्हतं. त्यांच्यासमोर इतर 6 अपक्ष उमेदवार उभे होते. त्यामुळे ऋतुजा लटकेंना किती मतं पडणार हे पाहणं महत्वाचं होते.

अंतिम फेरीतील पाहा आकडेवारी

 'नोटा मिळाल्या म्हणून नोटाला मतदान झालं का असा सवाल  ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी उपस्थित केला. नोटाला मिळालेलं मतदान विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवणारं आहे असंही ते म्हणाले. पण उद्धव ठाकरेंनी विकृत नेतृत्वाला गाडलं असं म्हणत सावंतांनी भाजपवर टीका केली. आपल्याला  विजयाचा आनंद आहेच पण लटकेंना दिलेल्या त्रासाचं दुःख असल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तर  या सगळ्यावर आमच्याकडे पुरेसं संख्याबळ असल्यानं निवडणूक लढण्याचा प्रश्नच नव्हता, असं प्रत्युत्तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. 

दरम्यान, शिवेसेनच्या उमेदवार ऋतुजा लटके या आघाडीवर असल्याने  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.  दरम्यान, लटके यांनी पहिल्यापासून चांगली आघाडी घेतली ती 19 व्या फेरीपर्यंत कायम होती. त्यामुळे विजय निश्चित मानला जात होता. उद्धव ठाकरे यांच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) शिवसेनेत चैतन्याचे वातावरण आहे. मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.