मुंबई: अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी मोठी गर्दी केलीये. सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. सिध्दिविनायकासाठी फुलांची खास आरास करण्यात आली. दुसरीकडे पुण्यातलं श्रीमंत दगुडशेठ गणेश मंदिरही पहाटे तीन वाजल्यापासून पुणेकरांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. दिवसभर मंदिरात गणेश यागासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.
दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केलीय. येत्या ९ ऑगस्टपासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरवात करण्यात येणार आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलंय.
अंगारकी चतुर्थी हा गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा दिवस समजला जातो. त्यामुळे या दिवसाची गणेशभक्त वर्षभर वाट पाहात असतात.