अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; उच्च न्यायालयाकडूनही ED कोठडीचा निर्णय

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ED कोठडीत राहणार...

Updated: Nov 7, 2021, 01:15 PM IST
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; उच्च न्यायालयाकडूनही ED कोठडीचा निर्णय  title=

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचा निकाल दिला होता. या सत्र न्यायालयाच्या निकालाला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यावर अनिल देशमुख यांनी चौकशीला विरोध न करता चौकशीसाठी तयार असल्याचे कळवले, त्यामुळे देशमुख यांना उच्च न्यायालयाने 12 तारखे पर्यंत पुन्हा ईडी कोठडी सुनावली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयात न्यायाधिश माधव जामदार यांनी ईडी कोठडीत वाढ देण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून देशमुख आता 12 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडीत राहणार आहेत.

देशमुखांना उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. तर आर्थर रोड तुरुंगातून पुन्हा एकदा ईडी कोठडीत जावे लागणार आहे