मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर हल्ला प्रकरणात राज्य सरकारकडून आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी DCP झोन 2 चे पोलीस उपायुक्त योगेश कुमार (DCP Yogesh Kumar) यांना त्यांच्या तात्पुरत्या पदावरून हटवण्यात आले आहे. निलोत्पल- डीसीपी क्राईम यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे. (DCP Zone II Yogesh Kumar shunted out on attack on Sharad Pawar's residence case)
योगेश कुमार यांना तात्पुरते हटवण्यात आले आहे. शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणात डीसीपींची बदली करण्यात आली आहे.
विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्या अध्यक्षतेखालील समिती घटनेची चौकशी करणार आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या प्राथमिक अहवालात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळवण्यात गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार गृह विभागाने मुंबई शहराचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून चौकशी करून अहवाल सादर केला आहे.