मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान गेल्या काही महिन्यांपूर्वी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अडचणीत आला होता. त्यानंतर अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये आर्यन खानकडे प्राथमिक तपासात ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी आर्यन खानवर एनसीबीने कारवाई केली होती. परंतू या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती.
एनसीबीने स्थापन केलेल्या रिपोर्टमध्ये आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तसेच ड्रग्ज प्रकरणातल्या कटात आर्यन खान सहभागी नाही. असे म्हटले आहे.
त्यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एनसीबीकडून एसआयटी रिपोर्टचे खंडन करण्यात आले आहे.'याप्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. त्या आधी कोणतीही प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल.' , असे एनसीबी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.