ब्रेकिंग: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता

मराठा समाजासाठी आनंदाची बातमी येणार?

Updated: Nov 13, 2018, 07:10 PM IST
ब्रेकिंग: मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता title=

मुंबई : मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या काही तासांत मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. या अहवालात मराठ्यांना थेट आरक्षण मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आयोगाने आणि राज्य सरकारने वेळमर्यादेच्या आत पडताळणी करुन मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे.

मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कारवाई नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करणार, सर्वांचे हित जपूनच मेगाभरती करणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधी केली होती. सर्व प्रकारची माहिती, जुने न्यायनिवाडे, राज्यघटनेतील तरतुदी असा सर्व विचार करून आणि शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करून राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल सादर करू, असे आश्वासन आयोगाने राज्य सरकारला दिले आहे, अशी माहिती राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टात सादर केली.