सिगारेट चोरणाऱ्या सात जणांवर मोका अंतर्गत कारवाई

 सात जणांविरोधात मोका अंतर्गत कारवाई

Updated: Sep 19, 2020, 05:16 PM IST

जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती : सिगारेट चोरी प्रकरणी बारामतीत सात जणांविरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. या आरोपींनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दरोडा टाकत साडेचार कोटींच्या सिगारेटचा ट्रक लंपास केला होता.

यामुळे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलीय.. 

जून महिन्यात राजंणगाव कडून हुबळीला जाणारा ट्रक आरोपींनी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत लुटला होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत आरोपींना गजाआड केले होते.. 

तपासानंतर या टोळीवर परराज्यातही गुन्हे असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं होतं.. यामुळे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव होता. प्रस्ताव मंजूर झाल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे डीवायएसपी नारायण शिरगावकर यांनी झी २४ तासला सांगितले.