मुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढली, 'भिकारीमुक्त मुंबई'साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Beggar Free Mumbai:  बेगर फ्री मुंबई हा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. यासोबतच ड्रग फ्री मुंबई हे अभियान सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Updated: Oct 11, 2023, 06:05 PM IST
मुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढली, 'भिकारीमुक्त मुंबई'साठी राज्य सरकारचा मोठा निर्णय title=

Beggar Free Mumbai: मुंबईत भिकाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भिकारीमुक्त मुंबई करण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यांसदर्भात माहिती दिली. 
कुठल्याही मंदिरात जा! भिकारी मागे लागतात. हा एक डाग मुंबईला आहे. त्यामुळे बेगर फ्री मुंबई हा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली. यासोबतच ड्रग फ्री मुंबई हे अभियान सुरू करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुंबईच्या विकासासंदर्भात विविध निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुंबईत टॉयलेट ची समस्या आहेत. यासाठी 30 कोटी रुपये दिले आहेत. यासाठी आम्ही युनिलिव्हरला काम दिल्याचे केसरकरांनी सांगितले. यासोबतच राणीच्या बागेत आपण लहान मुलांसाठी डबल डेकर बस आणणार आहोत. त्यातून लहान मुलांना राणीची बाग फिरवता येईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. दर बुधवारी नागरिकांच्या समस्यांसाठी मी मुंबई पालिकेत असेन, असे केसरकर यांनी सांगितले. सोमवार, मंगळवार, बुधवार, हे तीन दिवस ते मुंबईत असणार आहेत.  सिनियर सिटिझनसाठी योजना राबवली जात आहे. मुंबई उत्कृष्ट शहर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्या कडे कोळिवाडे आहेत पण त्याकडे लक्ष दिले जात नाही. काही नविन संकल्पना आपल्याला आणाव्या लागतील. तीन कोळीवाडे ट्रायल बेसवर घेतले आहेत. जिकडे काही बदल आपण करणार आहोत, असे केसरकर म्हणाले.

बाणगंग सारखे काही तलाव आहेत. तिकडे क्लासिकल म्युझिक तसेच कुल्लड मधून चहा देणं सुरु करु. तेथे नागरिक त्याचा अस्वाद घेतील अश्या अनेक नव्या संकल्पना त्यांनी मांडल्या. मुंबादेवीचा विकास आरखडा बनवला आहे. २०० कोटीचा आरखडा आहे. महालक्ष्मी ला गेले तर तिकडे पायरी आहेत पण लिफ्ट नाही. तिथे सुद्धा रस्ता 15 ऑक्टोबर पासून सुरु केले जाणार आहे. 

मुंबईत फूड ट्रक आपण सुरू करू शकतो. जिथे वाहतूक कमी आहे तिथे रात्रीच्या वेळी फूड ट्रक आणि टेबल टाकू शकतो, असे ते म्हणाले. फॅशन स्ट्रीट सुंदर करावं यासाठी वेगळा कार्यक्रम बीएमसी दिला आहेतिथे दुकान बंद झाल्यावर टेबल टाकून महिला फूड ट्रक टाकून काम करू शकतीलग्राउंड जिथे आहे तिथे अंडर ग्राउंड पार्किंग करून दुकान सुरू केले तर फेरीवाले अनधिकृत होणार नाहीत यावर सुद्धा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले. जुन्या इमारतींचा प्रश्नी लिस्ट तयार केली आहे. यानुसार इमारती पुनर्विकासाठी जाणार आहेत. मुंबईतील भाजी मार्केट, फिश मार्केट स्वच्छ झाली पाहिजेत. महालक्ष्मी रेसकोर्स कुठेही हलवणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. उलट महालक्ष्मी रेसकोर्सला अंडरग्राउंड मार्गाने जोडले जाईल, असे केसरकर म्हणाले.