बिहार पोलिसांनी नोंदवला अंकिता लोखंडेचा जबाब, सुशांतच्या बँक खात्यांची ही चौकशी

बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे.

Updated: Jul 30, 2020, 11:05 PM IST
बिहार पोलिसांनी नोंदवला अंकिता लोखंडेचा जबाब, सुशांतच्या बँक खात्यांची ही चौकशी

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात मुंबई आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमने सुशांत सिंह राजपूतच्या बँक खात्यांची चौकशी सुरु केली आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा जबाब नोंदवण्यात आला. जवळपास १ तास बिहार पोलिसांची टीम अंकिता लोखंडेच्या घरी होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंकिताकडून मिळणारी माहिती देखील महत्त्वाची आहे. बिहार पोलिसांनी अंकिता लोखंडेचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे.

दुसरीकडे बिहार पोलीस आज अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakrabatry) च्या घरी देखील चौकशीसाठी गेली होती. पण ती घरी नव्हती. रियाच्या विरुद्ध पटनामध्ये सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली आहे, ज्यामध्ये तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे. बिहार पोलिसांनी सुशांतच्या बँकेतून झालेल्या आर्थिक व्यवहारांबद्दल चौकशी सुरु केली आहे. 

सुशांतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र चौकशी सीबीआयकडे जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी 14 जूनला आत्महत्या केली होती. मुंबई पोलीस सध्या याची चौकशी करत आहे.