ठाण्यात पक्षांच्या मृत्यूचे सत्र सुरूच, पक्षी प्रेमी चिंतेत

देशावर कोरोनाचं संकट कायम असताना आता बर्ड फ्लूचाही धोका वाढू लागलाय.  

Updated: Jan 9, 2021, 03:31 PM IST
ठाण्यात पक्षांच्या मृत्यूचे सत्र सुरूच, पक्षी प्रेमी चिंतेत title=

ठाणे : देशात सध्या बर्ड फ्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान दोन दिवस आधी १४ पाणबगळे आणि दोन 2 पोपट मृतावस्थेत आढळले असताना, काल एक दुर्मिळ गिधाड देखील मृतावस्थेत सापडले आहेत. सोबत काही पांढरे बगळे आणि पाणबगळे देखील पुन्हा सकाळी मृतावस्थेत आढळले आहेत. त्यामुळे पक्षी प्रेमींची चिंता वाढली आहे. या पक्षांच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे.

पहिल्या 16 पक्षांचा बर्ड फ्ल्यूने मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही समोर आले नाही. अशा परिस्थित आणखी पक्षांचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, शुक्रवारी ज्या दुर्मिळ गिधाडाचा मृत्यू झाला, ते गिधाड दुर्मिळ प्रजातीत मोडले जाते. या दुर्मिळ गिधाडाची ओळख युरेशियन गिधाड अशी आहे. त्याच्या मृत्यूने पक्षी प्रेमींनी देखील चिंता व्यक्त केली. 

देशावर कोरोनाचं संकट कायम असताना आता बर्ड फ्लूचाही धोका वाढू लागलाय. बर्ड फ्लूमुळे बदक, कावळे, कोंबड्या मरु लागले आहेत.. राजधानी दिल्लीतील मयूर विहार सेंट्रल पार्कमध्ये तब्बल 200 कावळ्यांचा मृत्यू झाला. कावळ्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच प्रशासन सतर्क झालं आहे. डॉक्टरांची टीम तातडीनं घटनास्थळी दाखल झाली असून या भागात गेल्या चार दिवसांपासून कावळ्यांचा मृत्यू होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली.