भाजप राजकीय दहशत पसरवतेय, जीची विचारधारा नागपुरातून - शरद पवार

Sharad Pawar on BJP : सर्व यंत्रणांचा वापर करुन राजकीय दहशत पसरविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. सर्व देशातील सत्ता केंद्रीत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

Updated: Jul 12, 2022, 03:45 PM IST
भाजप राजकीय दहशत पसरवतेय, जीची विचारधारा नागपुरातून  - शरद पवार   title=

सागर कुलकर्णी / मुंबई  : Sharad Pawar on BJP : सर्व यंत्रणांचा वापर करुन राजकीय दहशत पसरविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. सर्व देशातील सत्ता केंद्रीत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. भाजप अशी सत्ता एकवटून एक विचारधारा, जी नागपुरातून दिली जाते. ती पसरविण्याचे काम करत आहेत, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. ते पुढे म्हणाले, सर्व सामान्य जनता हुशार आहे. अशी केंद्रीत केलेली सत्ता फार काळ टिकत नाही.  जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून, सुसंवाद ठेऊन लोकांचे प्रश्न सोडवा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला. 

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाली.  या बैठकीमध्ये शरद पवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजप सर्व यंत्रणा वापरुन राजकीय दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका  शरद पवार यांनी केली आहे. 

देशात सर्वत्र सत्ता केंद्रीत करण्याचा प्रयत्न भाजपचा डाव आहे.  भाजप अशी सत्ता एकत्रित करत नागपुरात जी विचारधारा आहे तीच देशभर पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. जरी असे केले तरी सर्वसामान्य जनता मात्र हुशार आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून सुसंवाद ठेवून लोकांचे प्रश्न सोडवा, भलेही सत्ता आज गेली असली तरी लोकांमध्ये आपल्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त राहीले पाहिजे. लोकांचे प्रश्न सोडवून लोकांना न्याय मिळवून द्या, असा सल्ला शरद पवार यांनी उपस्थितांना दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन दिवसाची बैठक आजपासून सुरु झाली आहे.  या बैठकीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे यासह वेगवेगळे आमदार जिल्हाध्यक्ष सहभागी झाले आहेत आगामी राजकीय परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राजकीय ओबीसी आरक्षण यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंथन करणार आहेत.