किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत.

Updated: Apr 23, 2022, 11:17 PM IST
किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या title=

मुंबई : खार पोलीस ठाण्याबाहेर मोठा राडा झाला आहे. भाजप (BJP) नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर (Shiv Sena) शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले आहेत. त्यांना दुखापत झाली आहे. तसेच या दगडफेकीत गाडीचं नुकसान झालं आहे. स्वत सोमय्या यांनी याबाबत ट्विट केलं आहे. (bjp leader kirit somaiya was injured in an attack on a vehicle by shiv sainiks at khar)

या हल्ल्यामध्ये शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगड, चप्पल आणि बाटल्या फेकल्याचं समोर येत आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली. या राणा दाम्प्त्याला भेटायला सोमय्या गेले होते.  तिथून परतताना त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी हा हल्ला केला. या दरम्यान हा शिवसैनिकांनी हल्ला केला. 

या हल्ल्यात सोमय्या यांच्या गाडीच्या दरवाज्याची काच फुटली आहे. त्याचवेळेस सोमय्या जखमी झाले. त्यांच्या हनुवटीतून रक्त आलं.  आता या सर्व हल्ल्याविरोधात किरीट सोमय्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले आहेत.