मुंबई : वरळीतल्या जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीत आज सकाळी भीषण स्फोट झाला. पाचव्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅब मध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाचं स्वरूप इतकं गंभीर होतं की दोन किलोमीटरपर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली. समोरच्या इमारतीतही या स्फोटाचा आघात दिसून आला. लॅबमध्ये एक मुलगी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mumbai: A cylinder blast reported at Manish Commercial Centre at Annie Besant Road in Worli. A team of fire brigade moved to the spot. More details awaited.
— ANI (@ANI) September 18, 2020
वरळीतील मनीष कमर्शियल सेंटर या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर असलेल्या केमिकल लॅबमध्ये हा स्फोट झाला. नायट्रोजन सिलिंडरचा हा स्फोट होता, अशी माहिती मिळत आहे. हा स्फोट इतका भयंकर होता की इमारतीचा काही भाग कोसळला. त्यात एक महिला जखमी झाली आहे. तिच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ जखम झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई | वरळीच्या जुन्या पासपोर्ट इमारतीतील तिस-या मजल्यावरच्या केमिकल लॅबमध्ये स्फोट. स्फोटाच्या मोठ्या आवाजानं वरळीत हादरली. पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास झाला स्फोट. दुर्घटनेत अद्यापपर्यंत कुणीही जखमी नसल्याची माहिती. https://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/6IchgEh87H
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 18, 2020