कृष्णात पाटील, मुंबई : 2021 च्या रेडिरेकनर दरानुसार सुधारीत कर लागू करण्याचा प्रस्ताव महानगर पालिका प्रशासनाने आज स्थायी समितीत मांडला होता. यामुळे मालमत्ता करात 14 टक्के वाढ करण्याचा होण्याची शक्यता आहे. मात्र,स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला आहे.
मालमात्ता कराच्या दरात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार 2020 मध्ये ही सुधारणा होणे अपेक्षीत होते. मात्र,कोविडमुळे राज्य सरकारने या वाढीला स्थगिती दिली होती.
मालमत्ता कर हा रेडिरेकनरच्या दरावर अवलंबून असल्याने एप्रिल 2021 मध्ये राज्य सरकारने निश्चित केलेल्या रेडिरेकनरच्या दरानुसार मालमत्ता कर आकरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तसा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता.
सर्व पक्षीय सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतल्यानंतर स्थायी समितीने हा प्रस्ताव राखून ठेवला. महानगरपालिकेने कोविड काळात विकासक, कंत्राटदार यांच्यावर सवलतींचा वर्षाव केला. तर दुसऱ्या बाजुला कोविड काळात सामान्यांचा मालमत्ता कर माफ होणे अपेक्षीत असताना दरवाढ केली जात आहे.