राखी सावतंला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

अभिनेत्री राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2024, 11:45 AM IST
राखी सावतंला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता title=

अभिनेत्री राखी सावंत सध्या अडचणीत सापडली असून, तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण राखी सावंतला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तिच्या या अटकेसाठी तिचा विभक्त पती आदिल खान दुर्रानी जबाबदार असणार आहे. आदिल खान दुर्रानीने राखी सावंतविरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीमुळे ही अटक होण्याची शक्यता आहे. राखी सावतंने खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर शेअर केल्याचा त्याचा आरोप आहे. याशिवाय राखी सावंतने काही मीडिया चॅनेल्सना आपले व्हिडीओ दिले होते. 

आदिल खान दुर्रानीने तक्रार केल्यानंतर राखी सावंतने अटकेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी दिंडोशी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने राखी सावंतला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. यानंतर तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. 

अटकपूर्व जामीन अर्ज का फेटाळला?

दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. राखीने कथितरित्या प्रसारित किंवा प्रसिद्ध केलेल्या चित्रफिती अश्लीलच नाहीत तर त्या आक्षेपार्हही आहेत. त्यामुळे प्रकरणातील तथ्ये, आरोप आणि परिस्थितीचा विचार करता राखी सावंतला अटकपूर्व जामीन मंजूर करणं योग्य नाही असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. 

कोणते कलम लावले?

राखीने बदनामीच्या हेतूने आमच्या खासगी चित्रफिती समाजमाध्यमांवरुन प्रसारित केल्या असा दावा करुन राखीचा विभक्त पती आदिल दुर्राणीने अंबोली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आदिलने राखीविरुद्ध अनेक कलमं लावली आहेत. ज्यामध्ये कलम 500 (मानहानी, 34 (सामान्य हेतू) आणि कलम 67A (इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतरच राखी सावंतने कोर्टात धाव घेतली होती. तिने अटक टाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पण तिला दिलासा मिळू शकलेला नाही. 

Tags: