diwali 2022: दिवाळीत घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा..अन्यथा करावा लागेल मनस्ताप

: दिवाळी सणाला सुरुवात (diwali 2022) झालीये. सगळीकडे लगबग आहे, दिवाळीच्या सुट्टीत आपण फिरायला जायचे प्लॅन आखत असू तर ही बातमी नक्की वाचा.. कारण सांताक्रूझ बेस्ट बस डेपो (santacruz bus depot employee on strike) मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत.

Updated: Oct 22, 2022, 01:02 PM IST
diwali 2022: दिवाळीत घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा..अन्यथा करावा लागेल मनस्ताप title=

diwali 2022 bus employee on strike : : दिवाळी सणाला सुरुवात (diwali 2022) झालीये. सगळीकडे लगबग आहे, दिवाळीच्या सुट्टीत आपण फिरायला जायचे प्लॅन आखत असू तर ही बातमी नक्की वाचा.. कारण सांताक्रूझ बेस्ट बस डेपो (santacruz bus depot employee on strike) मधील शेकडो कंत्राटी बस कर्मचारी आज सकाळी अचानक संपावर गेले आहेत.

आणि याचा सर्वात मोठा फटका प्रवाशांना बसणार आहे.  जेवढा पगार सांगितलं तेवढा न देता कमी दिला शिवाय बोनससुद्धा नाही म्हणून कर्मचारी संपावर गेले आहेत आणि याचा खूप मोठा फटका ऐन दिवाळीत प्रवाश्याना बसणार हे नक्की.

दिवाळीचा बोनस मिळालेला नाही शिवाय पगार 23500 सांगून 18500 देण्यात येतो, सुट्ट्यांबाबत निर्णय नाही अश्या विविध मागण्यांसाठी हे कंत्राटी वाहक, चालक संपावर  गेले आहेत , मागण्या मान्य होई पर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

त्यामुळे पश्चिम उपनगरात दिवाळीनिमित्त बाहेर पडणाऱ्यांसाठी आणि कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 
कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत?

1. दिवाळीचा बोनस दिला गेला नाही . 

2.वाहकाला पगार अठरा हजार पाचशे आहे मात्र तितका न मिळता  केवळ 12500 दिला जातोय.  तर ड्रायव्हर ला अपेक्षित पगार  23500 असून तो केवळ अठरा हजार दिला जातो त्यामुळे पगारात वाढ करण्यात यावी

3. बेस्टमध्ये काम करत असून देखील कामावर येण्यासाठी तिकीट काढावे लागते तर हा प्रवास मोफत करावा.