मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर

पुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 9, 2018, 11:27 AM IST
मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर title=

मुंबई : मध्य रेल्वेच्या ताफ्यात नवी कोरी बंबार्डीअर लोकल दाखल होत आहे. चेन्नईहून ही लोकल थेट कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. पुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल. 

मध्य रेल्वेने खरेदी केली नवी बंबार्डीअर

आतापर्यंत मध्य रेल्वेवर 4 बंबार्डीअर लोकल धावत आहेत. त्या सर्व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. आता मध्य रेल्वेने नव्या वैशिष्ट्य़ांसह स्वतःची बंबार्डीअर लोकल खरेदी केलीय. बंबार्डीअरच्या सीटस हा स्टेनलेस स्टीलच्या आहेत.

प्रवास अधिक सुखकर आणि प्रसन्न

बंबार्डीअरमुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि प्रसन्न होणार आहे, मागील ५ ते ६ वर्षात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अनेक नव्या लोकल गाड्या आल्या आहेत, त्या आधीच्या लोकल गाड्यांपेक्षा अधिक आरामदायी आणि हवेशीर वाटत असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे.