मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

 गेले दीड तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालीयं. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत.

Updated: Aug 10, 2018, 08:23 PM IST
मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

मुंबई : मोटारमन यांनी दिलेल्या संपाच्या हाकेनंतर मुंबईकरांचे हाल होणार असे वाटत असतानाच संप मागे घेतल्याचे सांगण्यात आले. रेल्वे प्रशासनाने मोटरमनशी घेतलेली बैठक यशस्वी झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. तरीही मध्य रेल्वे मार्गावरची गर्दी काही कमी होत नाही. गेले दीड तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालीयं. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे.

वेळ लागणार  ?

मोटारमन आणि रेल्वे प्रशासनाची बातचित सुरू असेपर्यंत रेल्वे काही काळ बंद होत्या. याचा ताण रेल्वे वेळापत्रकावर पडला आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. हे वातावरण निवळण्यासाठी अजून दोन तासाचा वेळ जाऊ शकतो अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.