मुंबई : सोशल मीडियावर 'चला दंगल समजून घेऊ' ही डॉ. स्वप्निल चौधरी यांची कविता व्हायरल होत आहे.दंगल काय असते, दंगलीत नेमकं काय होतं, आणि शेवटी काय उरतं, आपण काय केलं पाहिजे, आपण अखेर कोण आहोत, याचं अतिशय छान वर्णन या कवितेत आलं आहे. देशातील काही ठिकाणी अनेक वेळा तणावपूर्ण वातावरण तयार होते, यात अनेकांचे निष्पापांचे जीव जातात. या कवितेतील ओळ अतिशय लोकप्रिय होत आहे ती अशी आहे, घटनास्थळी जे जेलात गेले,त्यांना जामीन द्यायला आलं कोण, झेंड्यावाले का धर्मावाले, आले मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ...
दंगल म्हणजे नेमकं काय, ही दंगल कवितेच्या माध्यमातून समजवून सांगितली आहे, कवी आणि डॉ. स्वप्निल चौधरी यांनी चला दंगल समजून घेऊन कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हीडिओसाठी साभार - स्वप्निल चौधरी आणि त्यांचे यूट्यूब चॅनेल लिंक https://www.youtube.com/watch?v=sgz4V-no-_Y
----