'किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही'

मॉब लिचिंग करुन सोमय्यांच्या हत्येचा कट होता, चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार

Updated: Feb 10, 2022, 01:36 PM IST
'किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, आम्ही सहजासहजी घेणार नाही'  title=

मुंबई : भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर पुण्यात हल्ला करण्यात आला होता. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पत्र लिहिलं असून त्यात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर चंद्रकात पाटील यांनी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे. मॉब लिंचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता, किरीट सोमय्यांवर सूड उगवला गेलाय, असा आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी हा हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही असा इशारा दिला आहे. 

2019 ला विश्वासघात करुन महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलेल्याला येत्या २६ फेब्रुवारीला २७ महिने पूर्ण होतील. या काळात अनेकांचे भ्रष्टाचाराचे विषय समोर आले. दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत कधीच घडलेली नव्हती अशी मोठी उलथापालथ सुरु आहे. 

त्यामध्ये परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला,  अनिल देशमुख यांनी केलेली आरोपांवर काही कारवाई नाही झाली, म्हणून मग जयश्री पाटील नावाच्या वकिल आणि सामाजिक कार्यकर्त्या कोर्टात गेल्या आणि कोर्टाने सीबीआय सांगितली. सीबीआय चौकशी लागल्यानंतरही अनेक दिवस, अनिल देशमुख चकवा देत राहिले. पण त्यांना अटक झाली, संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

स्वत: ठाकरु कुटुंबियांमध्येही अनेक आरोप झाले. पण या सर्वात कधीही अशी परिस्थिती आली नव्हती की किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करा. सोमय्या यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणं, घोषणा देणं, पण केंद्राची झेड सुरक्षा असतानाही त्यांना धक्का मारुन किरीट सोमय्यांवर जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हे गेल्या २७ महिन्यात पहिल्यांदा झाला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

अशा एका माणसावर आरोप झालेत की त्याला ते सहन झाले नाहीत, त्याला ते पेलत नाहीएत,  आणि त्या सहन न होण्यातून हल्ला झाला आहे. आणि रोज उठून प्रेससमोर धमक्या दिल्या जात आहेत, आम्ही वाघ आहोत, मुंबई आमची आहे, असं सर्व सुरु झालं आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला आहे.

आरोप करणं हा त्यांचा अधिकार आहे, आपण कोर्टात जाऊ, कोर्टात आपली बाजू मांडू, त्यांना खोटं पाडू, नवाब मलिक यांच्या जावयापासून शाहरुखच्या मुलापर्यंत वेगवेगळे विषय झाले. सर्वांनी पोलीस आणि न्यायालायचा सहारा घेतला. रस्त्यावरुन उतरुन आंदोलनाचा सहारा घेतला. 
पण हे पहिल्यांदाच झालं की किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असतानाही जीवे मारण्याचा प्रयत्न. हे कशामुळे आहे, कारण लक्षात आलं आहे की आपण खूप बोलतोय. परंतु काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. तसं आता झालं. 

तुम्हाला असं वाटत असेल की केंद्र सरकार, देवेंद्र फडणवीस,किरीट सोमय्या हे तपास यंत्रणांना उपयोग करतायत, मग तुम्हाला न्यायावर विश्वास नाहीए का. न्यायालयात तूम्ही दाद मागू शकता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात टोळीचं सरकार सुरु आहे का, गृहमंत्री जेलमध्ये आहेत, मुंबईचे आयुक्त परागंदा होते, आणि आता आरोप करतायत. राज्याचे माजी सचिव सीताराम कुंटे यांनी आरोप केला आहे की पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मला अनिल देशमुख चिठ्ठी पाठवायचे, या राज्यात गोंधळ सुरु असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

किरीट सोमय्यांवर सूड उगावला गेला आहे, पण ते सातत्याने घोटाळे बाहेर काढत आहेत,  पण किरीट सोमय्यांवर झालेला हल्ला आम्ही सहजासहजी घेणार नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत पत्र लिहिलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी असं लिहिलं आहे, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.